सुशांत सिंग राजपूत आणि अंकिताचा म्हणून झाला ब्रेकअप

२०१६ या वर्षात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या. मलाइका-अरबाज, फरहान-अधुना हे अनेक वर्ष लग्नाच्या बंधनात राहिल्यानंतर ही ते वेगळे झाले. कॅटरिना-रणबीर कपूर यांच्यात देखील ब्रेकअपची बातमी समोर आली होती. पण यामध्ये आणखी एक जोडीचं नाव पुढे आलं ते म्हणजे पवित्रा रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मानव आणि अर्चना म्हणजेच सुशांतसिंग राजपूत आणि अर्चना यांचं.

Updated: May 5, 2016, 08:38 AM IST
सुशांत सिंग राजपूत आणि अंकिताचा म्हणून झाला ब्रेकअप title=

मुंबई : २०१६ या वर्षात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या. मलाइका-अरबाज, फरहान-अधुना हे अनेक वर्ष लग्नाच्या बंधनात राहिल्यानंतर ही ते वेगळे झाले. कॅटरिना-रणबीर कपूर यांच्यात देखील ब्रेकअपची बातमी समोर आली होती. पण यामध्ये आणखी एक जोडीचं नाव पुढे आलं ते म्हणजे पवित्रा रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या मानव आणि अर्चना म्हणजेच सुशांतसिंग राजपूत आणि अर्चना यांचं.

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीवर बनत असलेल्या चित्रपटात सुशांत हा धोनीचं पात्र करत आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार सुशांत आणि अर्चना यांचा ब्रेकअप का झाला याबाबत सांगण्यात आलं आहे. अंकिताला कौटुंबिक जीवनाला सुरुवात करायची होती पण याला सुशांतने साफ नकार दिला आणि अंकिताला एका सुपरस्टारसोबतचा चित्रपट यामुळे सोडावा लागला कारण सुशांतची एका टॉप बॉलिवूड प्रोडक्शन कंपनीसोबत खटपट सुरु होती.

बॉलिवूडमध्ये अजूनही काही लोकांचं असं मत आहे की, हे दोघं लवकरचं सर्व मतभेद दूर करुन एकत्र येतील. खरंच हे शक्य होतं का यावर दोघांच्या चाहत्यांची नजर असणार आहे.