रितेशच्या 'बँक चोर'चा फर्स्ट लूक!

अभिनेता रितेश देशमुख स्टारर यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालयं.

Updated: Apr 5, 2017, 09:28 AM IST
रितेशच्या 'बँक चोर'चा फर्स्ट लूक! title=

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख स्टारर यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालयं.

रितेश देशमुख पोस्टरमध्ये साधूच्या वेशभूषेत दिसतोय. रितेश देशमुखसोबतच या चित्रपटात विवेक ओबेरॉय आणि रेहा चक्रबर्ती मुख्य भूमिकेत दिसतील. 

उल्लेखनीय म्हणजे, या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी अनेक चित्रपटामध्ये थ्रीडीचे तंत्रज्ञान अनुभवले आहे. मात्र, या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना १६ डी तंत्रज्ञानाचा अनुभव घेता येणार आहे. अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणारा हा भारतातील पहिला चित्रपट असेल.