सैफच्या मुलीचा सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबत साखरपुडा?

सैफआली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिचा साखरपुडा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहरियासोबत झाल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Updated: Jun 20, 2016, 04:35 PM IST
सैफच्या मुलीचा सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबत साखरपुडा? title=

मुंबई : सैफआली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंगची मुलगी सारा अली खान हिचा साखरपुडा सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहरियासोबत झाल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत. सैराट चित्रपटाच्या स्क्रीनिंगला सारा पोहोचली असताना तिच्या हातामध्ये अंगठी दिसली तेव्हापासून तिच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरु आहेत. 

मे महिन्यामध्ये या दोघांचा एक फोटो सोशल नेटवर्किंगवर लीक झाला होता. या फोटोमध्ये सारा आणि वीर एकमेकांना किस करताना दिसत होते. तेव्हापासूनच या दोघांच्या अफेअरच्या बातम्या येत होत्या. 

सुशीलकुमार शिंदेंचा नातू वीर हा दुबईमध्ये शिकत आहे. पॉप स्टार बनण्याची त्याची इच्छा आहे. तर सारानं कोलंबिया विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलं आहे. करण जोहरचा आगामी चित्रपट स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून सारा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहेत.