NASA Mission Mars: अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या सदस्यांनी एक मोठा टप्पा गाठला आहे. नासाच्या मंगळ मोहिमेतील क्रू सदस्य वर्षभराच्या प्रवासानंतर त्यांच्या यानातून बाहेर आले. मात्र, या यानाने पृथ्वीवरून उड्डाणचं घेतलं नव्हतं.
खरं तर, नासाने ह्यूस्टनमधील जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये मंगळाच्या वातावरणा सारखीच एक राहण्यासाठी जागा तयार केली होती. 12 महिन्यांहून अधिक काळ बाहेरील जगापासून विभक्त राहिल्यानंतर शनिवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास चार क्रू मेंबर्स बाहेर आले.
भविष्यात मंगळावर मोहिम पाठवताना येणाऱ्या आव्हानांना तोंड देणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. क्रू मेंबर्सनी स्पेस वॉक म्हणजेच 'मार्सवॉक' देखील केलं. याशिवाय त्यांना त्या ठिकाणी गरजेचा असलेला भाजीपालाही पिकवला. केली हॅस्टन, आन्का सेलारिउ, रॉस ब्रॉकवेल आणि नॅथन जोन्स यांनी 25 जून 2023 रोजी 3D-प्रिंडेट राहण्याची सोय असलेल्या या कक्षेत प्रवेश केला. मिशनचे फिजिशियन आणि वैद्यकीय अधिकारी जोन्स म्हणालं की, बंदिवासात असलेले त्यांचे 378 दिवस लवकर व्यतीत झाले.
या 4 वैज्ञानिक लाल ग्रहासारख्या म्हणजेच मंगळ ग्रहासारख्या वातावरणात 1,700 चौरस फूट जागेत राहत होते. त्यांना भविष्यात मंगळावरील संभाव्य आव्हानांना सामोरं जावं लागलं. या आव्हानांमध्ये मर्यादित संसाधनं, अलगाव आणि पृथ्वीशी संपर्कात 22 मिनिटांचा विलंब यांचा समावेश होता. याशिवाय अशा आणखी दोन मोहिमा आखण्यात आल्याचं नासाने म्हटलंय. नासाच्या म्हणण्यानुसार, क्रू सदस्य अंतराळात राहतील आणि शारीरिक आणि वर्तणुकीशी संबंधित आरोग्य आणि कार्यक्षमतेशी संबंधित घटकांची माहिती गोळा करतील.
जॉन्सन स्पेस सेंटरचे डेप्युटी डायरेक्टर स्टीव्ह कॉर्नर म्हणाले, मंगळ ग्रह हेच आमचे उद्दिष्ट आहे. त्यांनी या प्रकल्पाचे वर्णन जागतिक अंतराळ संशोधनाच्या प्रयत्नात अग्रेसर बनण्याच्या अमेरिकेच्या ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.