मोहंजोदडोला मागे टाकत रुस्तमची जोरदार कमाई

अक्षय कुमार स्टारर रुस्तम बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. रुस्तमने मोहंजोदडोला मागे टाकत वीकेंडमध्ये जबरदस्त कमाई केलीये.

Updated: Aug 15, 2016, 02:45 PM IST
मोहंजोदडोला मागे टाकत रुस्तमची जोरदार कमाई title=

मुंबई : अक्षय कुमार स्टारर रुस्तम बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करतोय. रुस्तमने मोहंजोदडोला मागे टाकत वीकेंडमध्ये जबरदस्त कमाई केलीये.

तीन दिवसांत मोहंजोदडोला केवळ ३१.३ कोटींचा गल्ला जमवता आलाय. तर दुसरीकडे रुस्तमने तीन दिवसांत तब्बल ५०.५४ कोटी रुपये जमवलेत. 

त्यामुळे बॉक्स ऑफिसवर रुस्तम आणि मोहंजोदडोच्या शर्यतीत हृतिकचा मोहंजोदडो हा सिनेमा खूपच मागे पडत चाललाय. 

पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर रुस्तमचा जलवा दिसतोय. या वर्षात सर्वाधिक ओपनिंग करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत रुस्तम चौथ्या स्थानी आहे.