मुंबई: जीवनात केलेली एक चूक किती महागात पडू शकते, हे सांगणारं एक मराठी रोमॅंटिक गाणं झालयं व्हायरल. गाणं सुंदर तर आहेच मात्र त्यातून नकळत दिलेला सामाजिक संदेशही मोलाचा आहे.
वहीवर लिहतांना झालेली चूक खोडरबरने खोडून सुधारता येते, मात्र जीवन जगतांना झालेली एखादी चूक खोडण्यासाठी कोणताही खोडरबर नसतो. त्यामुळे जीवन जगतांना ठरवून दिलेले काही नियम पाळणे हे तितकेच गरजेचे असते.
सुखी जीवनात झालेल्या एका चूकीमुळे तुमचं आणि तुमच्या प्रियजनाचं आयुष्य कसं बदलू शकतं, हेच सांगणारं हे गाणं आहे. तुम्ही हे गाणं पाहा आणि गाण्यातील नायकाने केलेली चूक ओळखा. ती चूक तुम्ही करू नका आणि तुमच्या जवळील व्यक्तींनाही करण्यापासून थांबवा.
व्हिडिओ पाहा-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.