मराठी सिनेमाचा इंग्रजीतही बोलबाला

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विक्रमांचे एकापाठोपाठ एक इमले रचत आहे. मराठी सिनेमाच्या इतिहासात आतापर्यंत जे कोणाला जमले नाही ते सैराटने करुन दाखवले. यामुळेच इंग्रजीतही सैराटचा बोलबाला दिसून येतोय. 

Updated: May 7, 2016, 12:53 PM IST
मराठी सिनेमाचा इंग्रजीतही बोलबाला title=

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विक्रमांचे एकापाठोपाठ एक इमले रचत आहे. मराठी सिनेमाच्या इतिहासात आतापर्यंत जे कोणाला जमले नाही ते सैराटने करुन दाखवले. यामुळेच इंग्रजीतही सैराटचा बोलबाला दिसून येतोय. 

या सिनेमाने अवघ्या एका आठवड्यात २५.२५ कोटींची बक्कळ कमाई करत नवा विक्रम प्रस्थापित केला. तरुणाईसोबतच संपूर्ण महाराष्ट्राला या चित्रपटाची झिंग चढलीये.

इतकंच नव्हे तर या चित्रपटाने इंग्रजीलाही दखल घ्यायला लावली. द हिंदू, डीएनए, टाईम्स ऑफ इंडियासारख्या मोठ्या न्यूजपेपरर्सनीही या चित्रपटाची दखल घेतलीये. चित्रपटातील आर्चीची भूमिका साकारणारी रिंकूला राष्ट्रीय पुरस्काराही मिळाला. सैराटचे हे यश पाहता मराठी सिनेमाची प्रगती उंचावत असल्याचे दिसते.