अखेर साखर पुड्याविषयी बोलला सलमान खान

 सलमान खानने अखेर गर्लफ्रेंड लूलिआ वंतूरच्या बातम्यांवर आपलं मौन सोडलं आहे, यावर बोलतांना सलमान म्हणाला, माझी कुणाशाही सगाई झालेली नाही, या बातम्या अफवा आहेत, अशा बातम्या सतत येत असतात, मी बातम्या वाचतो, ऐकतो.

Updated: Oct 31, 2015, 03:07 PM IST
अखेर साखर पुड्याविषयी बोलला सलमान खान title=

मुंबई :  सलमान खानने अखेर गर्लफ्रेंड लूलिआ वंतूरच्या बातम्यांवर आपलं मौन सोडलं आहे, यावर बोलतांना सलमान म्हणाला, माझी कुणाशाही सगाई झालेली नाही, या बातम्या अफवा आहेत, अशा बातम्या सतत येत असतात, मी बातम्या वाचतो, ऐकतो.

मात्र अशा अफवांची मला सवय झाली आहे, पण अशा बातम्यांमुळे माझ्या परिवारात एक नाराजी येते, त्यातल्या त्यात माझे वडील सलीम खान नाराज होतात, ते मला सहन होत नाही.

यावर सलमान म्हणतो की, कोणत्याही गोष्टीचा अर्थ काढण्याआधी त्याचा विचार झाला पाहिजे, सलमान खान या वर्षी ५० वर्षांचा होणार आहे.

सलमान खान आपला आगामी चित्रपट सुल्तानसाठी १५ किलो वजन वाढवण्याच्या तयारीत लागला आहे. सलमान खानचा चित्रपट, सूरज बडजात्या निर्मित 'प्रेम रतन धन पायो' लवकरच रिलीज होणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.