सोनम सोबत रोमान्स करायला लाजतोय सलमान

सलमान खानला सोनम कपूरसोबत सहज रोमांस करण्यास अडचण येत असल्याचं म्हटलं जातंय, सूरज बडजात्या यांचा चित्रपट 'प्रेम धन पायो'मध्ये सलमान आणि सोनम कपूरची जोडी आहे, मात्र डीएनएने दिलेल्या बातमीनुसार सलमान सहज रोमँटिक सीन देऊ शकत नाहीय.

Updated: Oct 21, 2014, 05:43 PM IST
सोनम सोबत रोमान्स करायला लाजतोय सलमान title=

मुंबई : सलमान खानला सोनम कपूरसोबत सहज रोमांस करण्यास अडचण येत असल्याचं म्हटलं जातंय, सूरज बडजात्या यांचा चित्रपट 'प्रेम धन पायो'मध्ये सलमान आणि सोनम कपूरची जोडी आहे, मात्र डीएनएने दिलेल्या बातमीनुसार सलमान सहज रोमँटिक सीन देऊ शकत नाहीय.

यापूर्वी सलमानने आपल्यापेक्षा दुप्पट कमी वयाच्या हिरोईनसोबत काम केलं आहे. यात सोनाक्षी सिन्हा, डेजी शाह आणि जॅकलिन फर्नांडिस सोबत व्यवस्थित काम केलं आहे.

मित्राची मुलगी
सोनम सोबत काम करण्यास सहज रोमँटिक सीन देण्यास सलमानला अडचण होतेय, कारण अनिल कपूर आणि सलमान खान हे खुप जवळचे मित्र आहेत. 

सलमान खानने डीएनए पेपरशी बोलतांना सांगितलं, "सोनम माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, तिच्या वडिलांशी माझी फार जुनी मैत्री आहे, सोनम खूप लहान होती, तेव्हा मी तिला पाहिलं आहे, यामुळे मला मोठी अडचण होते". सलमान खान आणि अनिल कपूर यांनी अनेक चित्रपटांत सोबत काम केलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.