ऐश्वर्याच्या 'ऐ दिल है मुश्किल'शी सलमान खानचे हे खास कनेक्शन

 तुम्हाला माहिती आहे का सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाचा 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाशी जवळचा संबंध आहे. सलमानचे हे कनेक्शन तुम्हांला हैराण करू शकतं. तुम्हांला वाटत असेल की या चित्रपटात सलमान एक पाहुणा कलाकार म्हणून येणार पण तुम्ही चुकीचा विचार करताहेत. 

Updated: Oct 24, 2016, 05:47 PM IST
ऐश्वर्याच्या 'ऐ दिल है मुश्किल'शी सलमान खानचे हे खास कनेक्शन

मुंबई :  तुम्हाला माहिती आहे का सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाचा 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाशी जवळचा संबंध आहे. सलमानचे हे कनेक्शन तुम्हांला हैराण करू शकतं. तुम्हांला वाटत असेल की या चित्रपटात सलमान एक पाहुणा कलाकार म्हणून येणार पण तुम्ही चुकीचा विचार करताहेत. 

चला आम्ही तुम्हांला सांगतो की सलमानचा संबंध या चित्रपटात अनुष्का शर्माच्या नावाशी आहे. चित्रपटात अनुष्काचे नाव 'अलीजेह' आहे, हे नाव सलमानची बहिण अलवीराची मुलगी हीचे नाव आहे. आला ना सलमानचा या चित्रपटाशी संबंध... 

कोणी सांगितलं नावचं गुपीत

यावर शिक्कामोर्तब  करण जोहरने मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये केले आहे.. करण सांगितले की त्याने आपल्या चित्रपटातील कॅरेक्टरचे नाव कसे ठेवले. रणबीरचे नाव अयान हे त्याचा एक मित्र अयान मुखर्जीच्या नावावरून ठेवले, अनुष्काचे नाव अलवीरा खानच्या मुलीवरून ठेवले. ऐश्वर्या रायचे नाव 'सबा' हे स्वतः ठेवले आहे. 

या चित्रपटाची कहाणी लिहण्यासाठी केवळ ९ दिवस लागले.