काश्मीरमधल्या सुंदर वातावरणात सल्लूला आली कॅटची आठवण

'हिट अॅन्ड रन' प्रकरणात थोडा हायकोर्टाकडून थोडा दिलासा मिळाल्यानंतर अभिनेता दबंग सलमान खाननं सध्या काश्मीरमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये स्वत:ला गुंतवून घेतलंय. पण, इथल्या आल्हाददायक वातावरणातही सलमानला कतरीनाला काही विसरता आलं नाही.

Updated: May 19, 2015, 04:58 PM IST
काश्मीरमधल्या सुंदर वातावरणात सल्लूला आली कॅटची आठवण title=

सोनमार्ग : 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात थोडा हायकोर्टाकडून थोडा दिलासा मिळाल्यानंतर अभिनेता दबंग सलमान खाननं सध्या काश्मीरमध्ये आपल्या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये स्वत:ला गुंतवून घेतलंय. पण, इथल्या आल्हाददायक वातावरणातही सलमानला कतरीनाला काही विसरता आलं नाही.

सलमान सध्या कबीर खान दिग्दर्शित 'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. कामासोबतच कश्मीरमधल्या सुंदर वातावरणाचा... इथल्या नजाऱ्यांचा आनंद सलमान घेतोय. या नजाऱ्यांची स्तुती करताना सलमाननं 'माशाअल्लाह... माशाअल्लाह... माशाअल्लाहमुळे लक्षात आलं की कतरीनाही कश्मीरमधूनच तर आहे' असं ट्विटरवर म्हटलंय. 

'काश्मीर पाहिलं नाहीत तर काय पाहिलंत? जर पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे... इथेच आहे' असंही सलमाननं म्हटलंय. 

आणखी एक फोटो शेअर करत तो म्हणतो, 'वाह वाह... खूप मज्जा आली... कमालच केली काश्मीरजी...' शिवाय काश्मीरच्या सफरचंदाहून गोड आहेत काश्मीरी मुलं... काश्मीरमध्ये केवळ पर्यटन, पर्यटन आणि पर्यटनाचाच पूर यायला हवा... असंही सलमाननं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.