सलमान कॅटचा रोमान्स पुन्हा एकदा!

सलमान आणि कॅटचा पुन्हा एकदा बिग स्र्किनवर एकत्र झळकणार आहेत. टायगर जिंदा है या सिनेमाचं शुटींग ऑस्ट्रेलियामध्ये सुरु झालंय. शुटींगच्या निमित्तानं कॅट आणि सलमान पुन्हा एकत्र आले आहेत. 

Updated: Mar 16, 2017, 09:22 PM IST
सलमान कॅटचा रोमान्स पुन्हा एकदा! title=

मुंबई : सलमान आणि कॅटचा पुन्हा एकदा बिग स्र्किनवर एकत्र झळकणार आहेत. टायगर जिंदा है या सिनेमाचं शुटींग ऑस्ट्रेलियामध्ये सुरु झालंय. शुटींगच्या निमित्तानं कॅट आणि सलमान पुन्हा एकत्र आले आहेत. 

चार वर्षांनंतर सलमान आणि कॅट पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार असल्यामुळे त्यांचे चाहते जबरदस्त खूश आहेत. सलमान आणि कतरिनाची 'टायगर जिंदा है'चं शूट सुरु झालंय. या सिनेमाच्या पहिल्या शूटचं शेड्युल्ड ऑस्ट्रेलियामध्ये लागलंय. याच निमित्ताने हे दोन्ही स्टार्स ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाले आहेत. 

या सिनेमासाठी सलमानने खास 17 किलो वजन कमी केलंय. 'या सिनेमासाठी वजन वाढवणं आणि नंतर कमी करणं खुपचं कठीण होतं. मी 'टायगर जिंदा है' आणि रेमोच्या आगामी सिनेमासाठी तयारी करतोयं. 'सुल्तान'मध्ये माझं वजन 96 किलो होतं.आता या सिनेमासाठी मी 18-20 किलो वजन कमी केलंय' असं सलमाननं म्हटलंय. 

या सिनेमासाठी कॅटने पण फिटनेस चॅलेंज स्वीकारलंय. दबंग खानप्रमाणेच कतरिनाही या सिनेमात खतरनाक अॅक्शन सीन करताना दिसणार आहे. त्यामुळे कतरिनाही आपल्या लूकवर प्रचंड मेहनत घेताना दिसतेय. सलमान-कॅटचा हा मचअवेटेड सिनेमा 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.