सलमान खानने बनवले प्रेमात आकंठ बुडलेल्या महिला-पुरूषाचे पेंटिंग

 सुपरस्टार सलमान खानने एक महिला आणि पुरूषाचे प्रेमात आकंठ बुडल्याचे एक सुंदर पेटिंग काढले आहे. हे पेटिंग त्याचे स्वतःचे आणि बजरंगी भाईजान चित्रपटातील त्याची अभिनेत्री करिना कपूरचे असल्याची शक्यता आहे.  सलमानच्या या ब्लॅक अँड व्हाइट पेटिंगमध्ये प्रेमी युगल दिसत आहे. महिलेच्या माथ्यावर केवळ एक लाल टिकली झळकते आहे. 

Updated: Jun 17, 2015, 07:34 PM IST
सलमान खानने बनवले प्रेमात आकंठ बुडलेल्या महिला-पुरूषाचे पेंटिंग title=

मुंबई :  सुपरस्टार सलमान खानने एक महिला आणि पुरूषाचे प्रेमात आकंठ बुडल्याचे एक सुंदर पेटिंग काढले आहे. हे पेटिंग त्याचे स्वतःचे आणि बजरंगी भाईजान चित्रपटातील त्याची अभिनेत्री करिना कपूरचे असल्याची शक्यता आहे.  सलमानच्या या ब्लॅक अँड व्हाइट पेटिंगमध्ये प्रेमी युगल दिसत आहे. महिलेच्या माथ्यावर केवळ एक लाल टिकली झळकते आहे. 

हौशी कलाकार असलेला सलमान खानने ट्विटरवर आपल्या चाहत्यांसाठी हे पेटिंग ट्विट केले आहे. त्याने या फोटोचे शीर्षक 'बजरंगी भाईजान' असे ठेवले आहे. यापूर्वी सलमानने बजरंगी भाईजानचे पोस्टर देखील रिलीज केले होते. हा चित्रपट कबीर खान याने दिग्दर्शित केला आहे. 

हा चित्रपट ईदला रिलीज होणार आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.