मुंबई : सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री यामी गौतम यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगतेय. पुलकित काही दिवसांपूर्वीच सलमानची मानलेली बहीण श्वेता रोहिरापासून वेगळा झाला. दोघांच्या लग्नाला अवघं एक वर्षही झालं नव्हत. पुलकित आणि यामी यांच्या अफेअरमुळे श्वेतापासून वेगळं राहण्याचा पुलकितने निर्णय़ घेतल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, श्वेताने अद्याप याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. मात्र सलमान आपल्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतोय. गेल्या अनेक दिवसांपासून याप्रकरणावर शांत असलेल्या सलमानने पुलकित चांगलाच इशारा दिलाय. सलमानने बर्थडे पार्टीत पुलकितला बोलावले होते. यावेळी यामीपासून दूर रहा तसेच दोघांनी पुन्हा एकदा विचार करा असा सल्ला दिला.
लवकरच पुलकित सम्राट, यामी गौतम आणि उर्वशी रौतेला यांचा आगामी सिनेमा येतोय. नुकतेच उर्वशी आणि पुलकित यांच्यावर चित्रित करण्यात आलेले गाणे इंटरनेटवर लोकप्रिय ठरतेय.