सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'चा ट्रेलर रिलीज

सलमानने प्रॉमिस केल्याप्रमाणे आपला आगामी चित्रपट  'प्रेम रतन धन पायो' ट्रेलर ट्विटरवर रिलीज केला आहे. 

Updated: Oct 1, 2015, 05:30 PM IST
सलमानच्या 'प्रेम रतन धन पायो'चा ट्रेलर रिलीज title=

मुंबई : सलमानने प्रॉमिस केल्याप्रमाणे आपला आगामी चित्रपट  'प्रेम रतन धन पायो' ट्रेलर ट्विटरवर रिलीज केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची सुरूवात एका गाण्याने होत आहे. गाण्याच्या बॅकग्राऊंडमध्ये एक शाही महल आणि रॉयल परिवार दाखविला आहे. 

चित्रपटात एका खास अंदाजात एक सलमान खान दिसत आहे. फिल्ममध्ये त्याचा डबलरोल आहे. ट्रेलरमध्ये सलमानचा एक लूक 'हम साथ साथ हैं'तील लूकची आठवण करू देत आहे. दुसऱ्या लूकमध्ये तो दबंग दिसतो आहे. 

ट्रेलरमध्ये हा फिल्मी फॅमिली ड्राम आणि रोमान्स दिसतो आहे. सोनम कपूरला एका ट्रेडिशनल लूकमध्ये दाखविले आहे. सुरज बडजात्याचा हा चित्रपट दिवाळीला १२ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.