मुंबई : अभिनेता सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमातील "चल बेटा सेल्फी ले ले रे". या गाण्यावर आक्षेप घेत राज राठोड यांनी सलमान खान विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, त्यांची मागणी कोर्टाने फेटाळून लावली.
'बजरंगी भाईजान' हा चित्रपट येत्या रविवारी एका खासगी चॅनेलवर प्रसारित होणार आहे. तेव्हा त्यादरम्यान हे गाणं दाखवल जाऊ नये, अशी याचिकाकर्त्यांची मागणी होती.
याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात दावा केला की, या गाण्यात सलमान खान पायत बूट घालून नृत्य करतोय. तसेच बुटानेच त्याने गुलाल देखील उधळलाय, हनुमानाचा रथ ओढलाय. जेणेकरुन अनेक हनुमान भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्यात.
मात्र, जस्टिस व्ही एम कानडे यांनी याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत याचिका फेटाळून लावलीय. हायकोर्टानं स्पष्ट केलंय की सेन्सार बोर्डाच प्रमाणात असताना अशा प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.