मुंबई: बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा आगामी चित्रपट 'प्रेम रतन धन पायो' एक इंग्रजी कादंबरी 'द प्रिजनर ऑफ जेंडा'चं बॉलिवूड वर्जन असल्याचं बोललं जातंय. १९८४मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी अँथनी होप यांनी लिहिलीय.
यापूर्वी १९३७, १९५२ आणि १९७९मध्ये या विषयावर चित्रपट झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सूरज बडजात्या यांचा 'प्रेम रतन धन पायो' या कादंबरी सारखा वाटतोय.
आणखी वाचा - 'प्रेम रतन धन पायो'मध्ये सलमाननं फी विना केलं काम
'द प्रिजनर...'ची कथा ही अशा राजकुमाराची आहे ज्याला त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीसोबत बदललं जातं आणि नंतर तो राजकुमाराच्या सावत्र भावाचा राजकुमाराची संपत्ती हडपण्याचा कट हाणून पाडतो.
अशी आहे कथा
सूत्रांनुसार सलमानच्या चित्रपटाची कथा सुद्धा हीच आहे. यात प्रिंस विजय आणि प्रेम (सलमान) एकाच चेहऱ्याचे आहेत. विजय आपली बहिण (स्वरा भास्कर) आणि भाऊ निरंजन (नील नितीन मुकेश)वर खूप प्रेम करतो. चित्रपटात अनुपम खेर विजयच्या जागी प्रेमला घेऊन येतात जेणेकरून निरंजनच्या कटाची माहिती मिळावी. तिथं प्रेम मैथिली म्हणजे सोनमच्या प्रेमात पडतो. विजयची बहिण पहिले निरंजनला साथ देते पण नंतर ती सगळं खरं सांगते आणि प्रेम तिला वाचवतो.
कथेत थोडा फार बदल असू शकतो, पण ही कथा 'द प्रिजनर...'मधूनच घेतली गेलीय.
आणखी वाचा - 'प्रेम रतन धन पायो'चं नवीन गाणं 'जल्ते दिल' रिलीज
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.