सरोद वादक झरीन दारुवाला यांचं निधन

ज्येष्ठ सरोदवादक झरीन दारुवाला यांचं निधन झाले. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी गौरव आले होते. संगीत क्षेत्रातील तारा निखळला, अशी मान्यवरांची प्रतिक्रीया व्यक्त केली.

Updated: Dec 20, 2014, 11:19 PM IST
सरोद वादक झरीन दारुवाला यांचं निधन  title=

मुंबई : ज्येष्ठ सरोदवादक झरीन दारुवाला यांचं निधन झाले. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी गौरव आले होते. संगीत क्षेत्रातील तारा निखळला, अशी मान्यवरांची प्रतिक्रीया व्यक्त केली.

सरोद या वाद्यावर आपल्या जादुई सुरांनी त्यांनी शास्त्रीय संगीतात एक वेगळं स्थान निर्माण केलं. सरोद हे वाद्य वाजवणा-या मोजक्या वादकांपैकी त्या एक होत्या. अनवट राग आणि अनवट तालांच्या माध्यमातून पेशकारी करणं ही त्यांची खासीयत होती.

झरीन दारूवाला यांना १९८८ साली संगीत नाटक अकादमी अकॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच १९९० साली राज्यसरकारच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कारही त्यांना मिळाला होता. २००७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मान करण्यात आला होता.

सरोद वादक म्हणून अल्लउद्दीनखाँ, अहमद अलीखाँ, हाफीजखाँ, अमजद अलीखाँ, अली अकबर खाँ, शरणराणी माथुर आणि झरीन दारुवाला-शर्मा आदी प्रसिद्ध सरोदवादक यांचा उल्लेख आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.