सेक्स रॅकेटमध्ये सहभागी अभिनेत्रीला पकडलं रंगेहाथ

एका तेलुगू अभिनेत्रीला सेक्स रॅकेट संदर्भात रंगेहाथ पकडण्यात आलंय. तिच्यासह एका दलालाही पकडण्यात आलंय जो की टॉलिवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक आहे. 

Updated: Sep 1, 2014, 10:44 PM IST
सेक्स रॅकेटमध्ये सहभागी अभिनेत्रीला पकडलं रंगेहाथ title=

हैदराबाद : एका तेलुगू अभिनेत्रीला सेक्स रॅकेट संदर्भात रंगेहाथ पकडण्यात आलंय. तिच्यासह एका दलालाही पकडण्यात आलंय जो की टॉलिवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक आहे. 

टास्क फोर्सचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त एन. कोटी रेड्डी यांनी सांगितलं, ‘आम्हाला मिळालेल्या खातरीलायक माहितीच्या आधारे टास्क फोर्सनं (पश्चिम क्षेत्र)च्या टीमनं रविवारी रात्री बंजारा हिल्समध्ये एका हॉटेलमध्ये जाळं टाकलं आणि अभिनेत्री आणि आयोजक बालूला पकडलं. जे की या रेक्स रॅकेटमध्ये सहभागी होते.’

पोलीस अधिकाऱ्यानुसार टॉलिवूडमध्ये काही काळ सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या बालूनं पोलिसांच्या खोट्या ग्राहकांमधील एका सदस्याकडून अभिनेत्रीच्यावतीनं 1 लाखाची मागणी केली. त्याला 15 हजार दिले आणि उरलेली रक्कम अभिनेत्रीनं आपल्या जवळ ठेवली. रेड्डींच्या मते अभिनेत्रीला सुधार गृहात पाठवलंय. तर बालूला कोठडीत पाठवण्यात आलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.