शाहरुख-आलिया भट्ट गौरी शिंदेंच्या सिनेमात एकत्र!

दिग्दर्शक गौरी शिंदे यांच्या आगामी चित्रपटात शाहरुख खानबरोबर आलिया भट्ट ही युवा अभिनेत्री दिसण्याची दाट शक्यता आहे. 

Updated: Aug 21, 2015, 01:13 PM IST
 शाहरुख-आलिया भट्ट गौरी शिंदेंच्या सिनेमात एकत्र! title=

मुंबई : दिग्दर्शक गौरी शिंदे यांच्या आगामी चित्रपटात शाहरुख खानबरोबर आलिया भट्ट ही युवा अभिनेत्री दिसण्याची दाट शक्यता आहे. 

गौरी शिंदे याचा सिनेमा हा एका मुलीवर आधारित आहे. त्यामुळे आलियाला संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, आलियाच या सिनेमात असेल याबाबत अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आलेले नाही. परंतु बॉलिवूडमध्ये याची चर्चा मात्र सुरु आहे.

ही एका मुलीची कहाणी असून आयुष्याच्या विविध वळणांवर तीन विविध पुरुषांच्या प्रेमात पडण्याचा तिचा प्रवास या चित्रपटातून उलगडणार असल्याचे निर्माता करण जोहरने म्हटलंय. करणची धर्मा प्रॉडक्शन्स आणि शाहरुखची रेड चिली या कंपन्या मिळून या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. परंतु अद्याप निश्‍चित झाली नसल्याचे करणने आपल्या ट्विट करताना म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.