मुंबई : अभिनेता शाहरुख खान आपल्या आगामी 'हॅपी न्यू ईअर' या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. या सिनेमातील स्टंट आपण केवळ आपल्या मुलांसाठी - आर्यन आणि सुहानासाठी - केल्याचं शाहरुखनं म्हटलंय.
एका मुलाखतीदरम्यान बोलताना शाहरुखनं हा खुलासा केलाय. 'माझ्या दोन मुलांची इच्छा होती की मी जास्तीत जास्त स्टंट करावेत... आणि अशा गोष्टींमध्ये मी माझ्या पत्नीपेक्षा माझ्या मुलांचं जास्त ऐकतो... आणि त्यातच मला जास्तीत जास्त आनंद मिळतो'... असं शाहरुखनं म्हटलंय.
48 वर्षीय हा अभिनेता म्हणतो, कठिण वाटणाऱ्या स्टंटपासून दूर राहत जखमा टाळणं आपल्याला अजिबात पसंत नाही.
शाहरुख म्हणतो, 'हे स्टंट करताना खूप मजाही आली... मला असं वाटत होतं की मी काही आव्हानात्मक केलंच नाही तर मला जखमाच होणार नाहीत'
'खांद्यावर आणि पाठिवर जखमा झाल्यानंतर मी जास्त मजबूत झालोय. एक अभिनेता म्हणून शारीरिक, भावनिक आणि मानसिक रुपात आव्हानं स्वीकार करणं अतिशय महत्त्वाचं आहे... आणि माझ्याकडून जेवढे होतील तेवढे प्रयत्न मी करतो' असं म्हणत शाहरुख थोडा हळवाही झाला.
'हॅपी न्यू ईअर'मध्ये स्टंट कठिण होते... एका दृश्यात एका उंच इमारतीवरून मला खाली उडी मारायची होती... पण, यादरम्यान मला तारीनं बांधून संरक्षण देण्यात आलं होतं... हा स्टंट सुरक्षित होता पण खूपच भीतीदायकही...' असं यावेळी शाहरुखनं म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.