पाहा... शाहरुख खानचे 8 पॅक अॅब्स!

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खाननं आपलं नवं रूप आपल्या चाहत्यांसमोर आणलंय. सोशल वेबसाईट ट्विटरवर शाहरुखनं '8 पॅक अॅब्स'सहीत आपला एक फोटो शेअर केलाय. 

Updated: Sep 9, 2014, 10:47 AM IST

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खाननं आपलं नवं रूप आपल्या चाहत्यांसमोर आणलंय. सोशल वेबसाईट ट्विटरवर शाहरुखनं '8 पॅक अॅब्स'सहीत आपला एक फोटो शेअर केलाय. 

शाहरुखच्या आगामी 'हॅप्पी न्यू इअर'साठी त्यानं ही मेहनत घेतलीय. या सिनेमाची कथा दिग्दर्शिका फराह खान हिच्या नजरेतून पाहायला मिळणार आहे. 

2007 साली आलेल्या 'ओम शांती ओम' या सिनेमासाठी कोरिओग्राफरच्या भूमिकेतून फराह दिग्दर्शिकेच्या भूमिकेत शिरली होती. याच सिनेमासाठी, 48 वर्षीय अभिनेता शाहरुखनं सिक्स पॅक अॅब्सदेखील बनवले होते.  

डब्बू रत्नानीनं आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेला शाहरुखचा हा फोटो शाहरुखनं ट्विटरवर शेअर केलाय. या फोटोत तो एक दोरखंड पकडून जोशात उभा असलेला दिसतो.  

शाहरुखनं या फोटोसोबत एक मॅसेजही पोस्ट केलाय. 'हा फोटो डब्बू रत्नानीनं घेतलाय. धन्यवाद मित्रा... आणि अवि गवारिकरचेही आभार... फराह आता माझं आणखीन शोषण करू नकोस' असा मॅसेज शाहरुखनं आपल्या मित्रांसाठी या फोटोसोबत शेअर केलाय. 

'हॅप्पी न्यू ईअर' हा एक कॉमेडी सिनेमा आहे... या सिनेमात शाहरुखशिवाय सोनू सूद, अभिषेक बच्चन, दीपिका पादूकोण, बोमन इराणी, विवान शाह यांच्यादेखील भूमिका आहेत. हा सिनेमा 24 ऑक्टोबर रोजी सिनेगृहांत झळकणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.