कपीलच्या पहिल्याच शो मध्ये येणार शाहरुख

कलर्स चॅनलबरोबर झालेल्या वादानंतर कपिल शर्मानं आपला कॉमेडी नाईट्स विथ कपील हा शो बंद केला. 

Updated: Feb 20, 2016, 02:54 PM IST
कपीलच्या पहिल्याच शो मध्ये येणार शाहरुख title=

मुंबई: कलर्स चॅनलबरोबर झालेल्या वादानंतर कपिल शर्मानं आपला कॉमेडी नाईट्स विथ कपील हा शो बंद केला. आता कपिल सोनी चॅनलवर आपला नवा शो घेऊन येणार आहे. 

या शो चा पहिला गेस्ट असणार आहे, बॉलीवूडचा किंग खान शाहरुख. शाहरुखचा फॅन हा चित्रपट 15 एप्रिलला रिलीज होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख कपिलच्या शो मध्ये जाणार आहे. 

फॅन चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. पण कपिलचा हा नवा शो कधी ऑन एअर जाणार हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे.