सलमान आणि माझ्यात मैत्री कायम - शाहरूख

शाहरुखने सलमान आणि मी चांगले मित्र असल्याचे म्हटले आहे, पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर शाहरुख आणि सलमान खान यांचे चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाहरूखने हे वक्तव्य केलं आहे.

Updated: Jun 30, 2015, 06:25 PM IST
सलमान आणि माझ्यात मैत्री कायम - शाहरूख title=

मुंबई : शाहरुखने सलमान आणि मी चांगले मित्र असल्याचे म्हटले आहे, पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर शाहरुख आणि सलमान खान यांचे चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाहरूखने हे वक्तव्य केलं आहे.

'आम्ही सध्या चांगले मित्र आहोत. मैत्रीसाठी काहीही करण्यास तयार आहोत. आमच्यातील वाद आता राहिले नाहीत. कोणच्या चित्रपटाला किती प्रतिसाद मिळाला, याचा आमच्या मैत्रीशी काही संबंध नाही,' असं शाहरूख खानने म्हटलं आहे.

शाहरुख आणि सलमान यांच्यातील शीतयुद्ध गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेले आहे. नुकतेच सलमान बहिण अर्पिताच्या लग्नसमारंभात शाहरुखला निमंत्रण दिले होते. त्यावेळी या दोघांनी गळाभेट घेतली होती. अखेर शाहरुखने सलमान मित्र असल्याचे म्हटले आहे.

शाहरुखचा ‘रईस‘ आणि सलमानचा ‘सुल्तान‘ हे चित्रपट पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.