नवी दिल्ली : छोट्या पडद्यावर एकेकाळी लोकप्रिय झालेली मालिका 'क्योंकी सास भी कभी बहू थी'मध्ये दिसलेल्या 'बा'चं म्हणजेच अभिनेत्री सुधा शिवपुरी यांचं निधन झालंय. त्या ७८ वर्षांच्या होत्या. गेल्या कित्येक दिवसांपासून आजारी होत्या.
एकता कपूर निर्मित गाजलेल्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या कार्यक्रमात तुलसी म्हणजेच स्मृती इरानी यांच्या आजेसासूची भूमिका सुधा शिवपुरी यांनी निभावली होती. आपल्या पतवंडांना प्रेम लावणाऱ्या या कार्यक्रमात दिसणाऱ्या 'बा'नं अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
२००२, २००३, २००४, २००५, २००७ अशी सलग पाच वर्ष त्यांनी 'स्टार परिवार अवॉर्ड' जिंकला होता.
सुधा शिवपुरी यांनी अनेक हिंदी सिनेमांतही काम केलंय. स्वामी, इंसाफ का तराजू, अलका, पिंजर, हमारी बहू, सावन को आने दो, द बर्निंग ट्रेन यांसारख्या सिनेमांतून त्या प्रेक्षकांसमोर आल्या होत्या.
सुधा शिवपुरी यांचे पती ओम शिवपुरी यांनीही अनेक हिंदी सिनेमांत काम केलंय. सुधा शिवपुरी यांचा जन्म राजस्थानात झाली होता...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.