सुल्तानची पहिल्या दिवशी ३६.५४ कोटींची कमाई

सलमान खान, अनुष्का स्टारर सुल्तान या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ३६.५४ कोटींची कमाई धमाकेदार ओपनिंग केलेय. 

Updated: Jul 7, 2016, 02:58 PM IST
सुल्तानची पहिल्या दिवशी ३६.५४ कोटींची कमाई title=

मुंबई : सलमान खान, अनुष्का स्टारर सुल्तान या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ३६.५४ कोटींची कमाई धमाकेदार ओपनिंग केलेय. 

सलमानच्या सुपहिट सिनेंमांपैकी एक असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली. या चित्रपटाने जरी मोठी कमाई केली असली तरी हा चित्रपट प्रेम रतन धन पायो या सिनेमाचा रेकॉर्ड तोडू शकला नाही.

सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर बॉलीवूड तज्ञांनी हा सिनेमा ४० कोटी पार करत नवा विक्रम रचेल असे वाटत होते मात्र हा रेकॉर्ड बनवण्यात सुल्तान अपयशी ठरला.

सलमानचे चित्रपट आणि पहिल्या दिवसाची कमाई

प्रेम रतन धन पायो - ४०.३५ कोटी
सुल्तान - ३६.५४
एक था टायगर - ३२.९३
बजरंगी भाईजान- २७.२५ कोटी
किक - २६.४० कोटी