सुल्तानची जगभरात ४५० कोटींची कमाई

बॉलीवूड अभिनेता सलमान खान स्टारर सुल्तान हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुस्साट धावतोय. या सिनेमाने ११ दिवसांत जगभरात तब्बल ४५० कोटींची कमाई केलीये. 

Updated: Jul 18, 2016, 01:28 PM IST
सुल्तानची जगभरात ४५० कोटींची कमाई title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान स्टारर सुल्तान हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुस्साट धावतोय. या सिनेमाने ११ दिवसांत जगभरात तब्बल ४५० कोटींची कमाई केलीये. 

भारतात या सिनेमाने तब्बल २५० कोटीहून अधिक कमावलेत. जगभरात अधिक कमाई करणाऱ्या टॉप ५ सिनेमांच्या यादीत आता सुल्तान चौथ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी पीके, दुसऱ्या स्थानी बजरंगी भाईजान आणि तिसऱ्या स्थानी धूम ३ आहे.

या विक्रमी कमाईसोबतच सुल्तानने बॉक्स ऑफिसवरचे अनेक विक्रम मोडीत काढलेत. या सिनेमाने पहिल्याच दिवशी सुमारे ३६ कोटींची कमाई करत नवा रेकॉर्ड रचला होता.