देओल परिवाराची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये

अभिनेता सनी देओलचा मुलगा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. 

Updated: May 24, 2017, 11:55 AM IST
देओल परिवाराची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये  title=

मुंबई : देओल परिवाराची तिसरी पिढी बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेता सनी देओलचा मुलगा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच 'पल पल दिल के पास' या सिनेमाव्दारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

 सनी देओलने टि्वट करत ही माहिती दिली आहे. करणबरोबरचा सनीनं स्वतःचा फोटोही शेअर केला आहे. शाहरुख खान, सलमान खान, अभिषेक बच्चनसह अनेक बॉलिवूड स्टार्सने करणला त्याच्या बॉलिवूड पदार्पणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.