Sunil Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. सुनील शेट्टीनं आजवर अनेक गाजलेले चित्रपट दिले आहेत. आता तो वयाच्या त्या टप्प्यावर पोहोचला आहे ज्या वयात अनेकांना दुसऱ्याच्या आधाराची गरज असते. पण त्याच्याकडे पाहिल्यावर कोणी बोलणार नाही की त्याचं वय हे 63 आहे. कोणीही बोलेल की तो अजूनही तरुण आहे. दरम्यान, सुनील शेट्टीचा नवा व्हिडीओ हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
सुनील शेट्टीचा हा नवा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूडनं शेअर केला आहे. या व्हिडीओत सुनील शेट्टी हा त्याचा नवा हेअर कट आणि त्याची स्टाईल फ्लॉंट करताना दिसत आहे. त्याच्या लूकनं सुनीलं सगळ्यांच्या मनं पुन्हा एकदा जिंकली आहेत. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करताना दिसत आहे. जर कोणी हे म्हटलं की 'अन्ना' चं वय हे जसे दिवस जात आहेत तसं कमी होतंय. दुसरा नेटकरी म्हणाला, या वयातही तो किती हॅडसम दिसतोय. तिसरा नेटकरी म्हणाला, अंजलीला भेटायला जायचंय वाटतं.
सुनील शेट्टीचा जन्म हा दाक्षिणेत झाला. त्यानं 1992 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी बलवान या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर 90 च्या दशकात तो गाजलेल्या बॉलिवूड कलाकारांपैकी एक होता. सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये त्याचं नाव होतं.
हेही वाचा : अभिषेक बच्चनला दरमहिन्याला SBI देते 18 लाख रुपये! जाणून घ्या कारण
खासगी आयुष्याविषयी बोलायचं झालं तर 1991 मध्ये माना शेट्टीशी लग्न केलं होतं. तर माना शेट्टी ही बिझनेसवुमेन डिझायनर आणि सोशल अॅक्टिविस्ट आहे. त्यांना दोन मुलं आहेत आणि अथिया आणि अहान अशी त्यांची नावं आहे. अथियानं क्रिकेटर केएल राहुलशी लग्न केलं आहे. सुनील गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'ऑपरेशन फ्राइडे' मध्ये दिसला होता. आता तो लवकरच अक्षय कुमारसोबत 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपट सेलिब्रिटींची भलीमोठी कास्ट पाहायला मिळणार आहे. त्याशिवाय तो 'हेरा फेरी 3' या चित्रपटात देखील दिसणार आहे. त्यात देखील त्याच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार दिसणार आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.