IND vs PAK: पत्त्यासारखी विखुरली पाकिस्तानची टीम; १०५ धावांवर गारद

India vs Pakistan Scorecard: ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबईमध्ये सुरु आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 6, 2024, 05:27 PM IST
IND vs PAK: पत्त्यासारखी विखुरली पाकिस्तानची टीम; १०५ धावांवर गारद
Photo Credit: AP

IND W vs PAK W: 3 महिन्यांनंतर, पुन्हा एकदा पुरुषांच्या T20 विश्वचषक 2024 मध्ये पाहिल्या जाणाऱ्या हाय व्होल्टेज सामन्याची प्रतीक्षा संपली आहे.  क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढाई पुन्हा एकदा किक्रेट चाहत्यांना बघता येत आहे.  ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुबईमध्ये सुरु आहे. दोन्ही संघांमध्ये 3 वाजता नाणेफेक झाली. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून कर्णधार फातिमा सनाने  प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Add Zee News as a Preferred Source

 

पाकिस्तानने केल्या 105 धावा 

टी-20 विश्वचषकात भारताविरुद्धच्या गोलंदाजीवर विजय मिळवून पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना 105 धावा केल्या. भारताला 8 विकेट्स मिळाल्या. अरुंधती रेड्डीने तीन आणि श्रेयंका पाटीलने 2 गडी बाद केले.

अरुंधतीची दमदार बॉलिंग  

अरुंधतीने शेवटच्या षटकात पाकिस्तानला आठवा धक्का दिला. निदा दार २८ धावा करून बाद झाली. अरुंधती रेड्डीनी तिला क्लीन बोल्ड केले. 

 

पहिला सामना 

पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध उत्कृष्ट शैलीत विजय मिळवला. दुसरीकडे टीम इंडियालाही विजयाची अपेक्षा होती. पण न्यूझीलंड संघाने हरमनप्रीत अँड कंपनीचा 58 धावांनी पराभव केला. जर भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध हरला तर उपांत्य फेरीचा प्रवास आणखी कठीण होईल. 

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More