मुंबई : कॅनडियन पॉर्न स्टार म्हणून ओळखली जाणाऱ्या सनी लिऑननं आता आपलं संपूर्ण लक्ष बॉलिवूडवर केंद्रीत केलंय. आता तिनं बॉलिवूडचा आणखी एक सिनेमा मिळवलाय.
सनीनं ‘जिस्म-२’ मधून बॉलिवूडमध्ये करिअरची सुरुवात केली होती. आपल्या बोल्ड अदांचा तडका लावत तिनं लाखो प्रेक्षकांना भुलवून टाकलं. सनी लिओनचा हा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर गल्ला गोळा करण्यात हिट ठरला. त्यानंतर सनीन फिल्म डायरेक्टर आणि दिग्दर्शकांची खास बनलीय.
सनी सध्या आपल्या आगामी ‘मस्तीजादे’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘टी ना अँन्ड लोलो’ आणि ‘मस्तीजादे’नंतर सनीनं आणखी एक सिनेमा साईन केलाय.
जॅस्मीन डिसूझाच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या ‘वन नाईट स्टँड’ नावाच्या या सिनेमात सनी राणा दग्गुबातीसोबत रोमांस करताना दिसेल. सनी आणि राणासोबतच या सिनेमात आणखी एक अभिनेत्री दिसणार आहे. हा सिनेमाचं शूटिंग नोव्हेंबरपासून सुरू होईल, असं समजतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.