नवी दिल्ली : भारत सरकारनं पॉर्न वेबसाईटवर घातलेली बंदी आता अंशी हटवलीय. पण, सरकारच्या पॉर्न बंदीच्या निर्णयानं अनेकांची झोप उडवली... अर्थातच नेहमीप्रमाणे या विषयावरही सोशल वेबसाईटवर वेगवेगळ्या मतांची 'टिवटिव' पाहायला मिळाली. सनीनंही काही न बोलता या चर्चेत सहभाग दर्शवला.
मंगळवारी, केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने चाइल्ड पॉर्न आणि ब्ल्यू फिल्म सोडून सर्व एडल्ट्स साइटवर बंदी हटविण्याचा निर्णय जारी केला. पण, त्याआधी अनेकांनी बंदीविरोधात रणशिंग फुंकलं होतं. एकेकाळी पॉर्न स्टार अशी ओळख असलेल्या आणि बॉलिवूडमध्ये सध्या चांगलाच जम बसवलेल्या सनी लिओनही यात मागे राहिली नाही.
सनीच्या प्रतिक्रियेची खासियत म्हणजे काहीही न बोलता सनीनं आपली प्रतिक्रिया आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवलीय. सनीनं ट्विटरवर आपला एक फोटो शेअर केलाय. यात सनीसोबत तिचा नवरा डॅनियल वेबर दिसतोय... आणि डॅनियलनं परिधान केलेल्या शर्टवर लिहिलंय 'सेक्स सेल्स'...
;) ;) pic.twitter.com/rDGAoMPn9u
— Sunny Leone (@SunnyLeone) August 4, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.