close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सुशांतसिंग राजपूतचा ट्विटरला रामराम

बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतनं ट्विटरवरचं आपलं अकाऊंट डिऍक्टिव्हेट केलं आहे.

Updated: May 22, 2016, 05:13 PM IST
सुशांतसिंग राजपूतचा ट्विटरला रामराम

मुंबई: बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतनं ट्विटरवरचं आपलं अकाऊंट डिऍक्टिव्हेट केलं आहे. इतके दिवस ट्विटरवर ऍक्टिव्ह असलेल्या सुशांतनं अचानक हे पाऊल का उचललं याबाबत मात्र चर्चा सुरु आहे. 

सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचं ब्रेक अप झालं आहे. या ब्रेक अपबाबत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर बातम्या प्रसिद्ध झाल्या. यामुळेच  सुशांतनं ट्विटरला रामराम केल्याचं बोललं जात आहे.

सुशांतसिंग राजपूतचा भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावरचा बायोपिक थोड्याच दिवसांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या प्रोमोशनवेळी सुशांत पुन्हा एकदा ट्विटरवर ऍक्टिव्ह होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.