मुंबई: अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याची माहिती अमरापूरकर यांच्या कन्या रिमा यांनी दिली. अमरापूरकर यांच्या प्रकृतीसंदर्भात सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रचारावर त्यांच्या कुटुंबियांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
अमरापूरकर यांच्यावर सध्या मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना फुफ्फुस आणि मधुमेहाचा आजार असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. काल संध्याकाळपासून त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आल्याची माहिती त्यांच्या कन्येनं काल दिली होती. त्यानंतर अमरापूरकर यांच्या प्रकृतीसंदर्भातल्या उलटसुलट बातम्या अनेक माध्यमातून फिरत आहेत.
दरम्यान या बातम्यांवर कोणीही विश्वास ठेवू नये. त्यांची तब्येत चिंताजनक असली तरी स्थिर असल्याचं अमरापूरकर यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.