ते स्वतःची कबर खोदत आहेत, कॉमेडी नाइट्सची डायरेक्टर प्रत्युत्तर

 कपिल शर्माच्या कॉमेडी नाइट्स बंद होऊन एक आठवडा झाला, तरीही त्याचा वाद अजूनही कायम आहे. कॉमेडी नाइट्स विथ कपिलची क्रिएटीव्ह डायरेक्टर प्रिती सिमॉन्स हीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Updated: Feb 2, 2016, 09:44 PM IST
ते स्वतःची कबर खोदत आहेत, कॉमेडी नाइट्सची डायरेक्टर प्रत्युत्तर  title=

मुंबई :  कपिल शर्माच्या कॉमेडी नाइट्स बंद होऊन एक आठवडा झाला, तरीही त्याचा वाद अजूनही कायम आहे. कॉमेडी नाइट्स विथ कपिलची क्रिएटीव्ह डायरेक्टर प्रिती सिमॉन्स हीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

प्रितीने कृष्णा अभिषेक आणि कलर्स चॅनल्सला त्याच्या अपरिपक्व दाव्याविषयी फटकारले आहे. 

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कृष्णाने दावा केला होता की कपिल शर्मा हा त्याच्या कॉमेडी नाइट्स बचाओमुळे खूप अस्वस्थ झाला होता.  कॉमेडी नाइट्स विथ कपिल बंद झाल्यानंतर कृष्णाने ही मुलाखत दिली होती. त्यानंतर कलर्स टीव्हीचे सीईओ राज नायक यांनी शो बंद होण्याचे खरं कारण सांगितले तसेच शो रिप्लेस का करण्यात आला हे देखील स्पष्ट केले. 

राज याने आपल्या दाव्यात म्हटले होते की कपिलने आपल्या शो साठी खूप मोठा मोबदला मागितला होता. त्याने आठवड्यातून दोनदा असणारा हा शो त्याने त्याची चित्रपटामुळे एकदा केला होता. कपिलचा हेकेखोरपणा आणि त्याची असुरक्षितता यामुळे आम्ही शो ऑफ एअर केला. 

या सर्व प्रकरणात कपिल शर्माने अद्याप बोलणे टाळले असले तरी कॉमेडी नाइट्स विथ कपिल ची क्रिएटिव्ह डायरेक्टर प्रिती सिमॉन्स हिने कृष्णा आणि चॅनलच्या सीईओला फटकारले आहे. 

प्रिती म्हणाली, कृष्णा आणि सीईओचे खूप अपरिपक्व वक्तव्य आहे. कपिल शर्मा याला कृष्णापासून असुरक्षित वाटण्याचे कारण काय? हे इतके सोपे आहे. कृष्णाला स्वतःला कपिलच्या स्तरावर नेऊन ठेवायचे आहे म्हणून कपिलशी स्वतःची तुलना करत आहे, असे प्रितीने एका वेबसाइटशी बोलताना सांगितले. 

कपिल शर्मा  कॉमेडी सर्कसमधून पुढे आला आहे. कॉमेडी सर्कस बंद झाल्यावर कपिल काहीच बोलला नाही. कॉमेडी क्लासेस हे कृष्णाने केले त्याबद्दलही कपिल कधी काही बोलला नाही. त्यानंतर कॉमेडी नाइट्स बचाओ हे कलर्सवर आले, पण त्याने कधी नंबर १ शो म्हणून मान मिळाला नाही. किंवा त्या स्तरापर्यंतही पोहचला नाही. पण त्यांनी जाहीर केले की आम्ही नंबर १ आहोत, आम्हांला सर्वाधिक टीआरपी आहे. 

त्यांचे सर्वात महत्त्वाचे काम आहे, लोकांना हसविणे आहे.  पण ते एखाद्या खाली पाडून दुसरा कसा मोठा आहे हे दाखविण्यात त्यांचा वेळ जात आहे, असेही प्रितीने स्पष्ट केले. 

कृष्णा आणि भारती म्हणताहेत की कलर्सने कपिलला मोठे केले. त्यावर प्रिती म्हणते कपिलने सर्वात प्रथम स्टार वन वरील लाफ्टर चॅलेंज जिंकले होते. लाफ्टर चॅलेंजने कपिलला ओळख मिळवून दिली होती. त्यानंतर त्याने कॉमेडी सर्कसचे सहा सिझन जिंकले होते. कॉमेडी सर्कसने कपिलला ओळख मिळवून दिली. त्याने स्वतःच्या जिवावर प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. कोणी त्याला मोठं केले नाही...