विराटच्या 'लवलेडी'चा लवकरच एक्स-बॉयफ्रेन्डसोबत रोमान्स

रणवीर सिंह बरोबर ब्रेकअप घेतल्यानंतर पहिल्यांदा अनुष्का शर्मा आणि रणवीर सोबत एका स्क्रीनवर दिसणार आहेत.   bollywoodlife या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन व्हेंचरच्या एका सिनेमात रणवीर आणि अनुष्काचा रोमान्स प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Updated: Nov 25, 2014, 06:58 PM IST
विराटच्या 'लवलेडी'चा लवकरच एक्स-बॉयफ्रेन्डसोबत रोमान्स title=

मुंबई : रणवीर सिंह बरोबर ब्रेकअप घेतल्यानंतर पहिल्यांदा अनुष्का शर्मा आणि रणवीर सोबत एका स्क्रीनवर दिसणार आहेत.   bollywoodlife या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन व्हेंचरच्या एका सिनेमात रणवीर आणि अनुष्काचा रोमान्स प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

विराट कोहलीची लवलेडी अनुष्काने आपल्या प्रॉडक्शन वेंचरच्या दुसऱ्या चित्रपटासाठी रणवीस सिंहशी चर्चा केली होती. या दरम्यान अनुष्काने रणवीरला चित्रपटाच्या स्किप्ट विषयी सांगितलं होतं.  रणवीरला ही स्क्रीप्ट खूप आवडली असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाआधी जोया अख्तरचा चित्रपट दिल धडकने दो मध्ये हे जोडी दिसणार आहे.
 
बँड बाजा बारातमधली ही प्रसिद्ध जोडी एकदा एक दुसऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली होती. पण या प्रेमाचे रंग जास्त दिवस टिकले नाहीत, हे रंग फिकट झाले आणि अनुष्का-रणवीर यांचं ब्रेकअप झालं. अनुष्का सध्या विराट कोहलीसोबत प्रेमाचे धडे गिरवतेय, तर रणवीर सिंहची दीपिकासोबत डेट वर डेट सुरू आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.