कुटुंबासोबत बिनधास्त पाहा ‘राजा नटवरलाल’ - सिरिअल किसर

‘राजा नटवरलाल’ या आगामी सिनेमात इमरान हाश्मी एक 420 हिरो म्हणून समोर येतोय.

Updated: Jul 29, 2014, 12:28 PM IST
कुटुंबासोबत बिनधास्त पाहा ‘राजा नटवरलाल’ - सिरिअल किसर title=

मुंबई : ‘राजा नटवरलाल’ या आगामी सिनेमात इमरान हाश्मी एक 420 हिरो म्हणून समोर येतोय.

‘सिरियल किसर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमरानचा हा पहिलाच सिनेमा आहे जो संपूर्ण कुटुंबासोबत एकत्र बसून पाहता येऊ शकतो, असं म्हणणं आहे खुद्द इमरानचं...

80 च्या दशकात आलेल्या अमिताभ बच्चनचा सिनेमा ‘नटवरलाल’मध्ये अमिताभ 420 व्यक्तीच्या भूमिकेत दिसला होता. पण, इमरानच्या म्हणण्यानुसार, त्या ‘नटवरलाल’ आणि ‘राजा नटवरलाल’ हे दोन वेगवेगळे सिनेमे आहेत आणि दोघांमध्ये काहाही साधर्म्य नाही... किंबहुना आपण रंगवत असलेला 420 हिरो अमिताभपेक्षा वेगळा आहे.  

गेल्या काही वर्षांमध्ये भट्ट कॅम्पसोबत खूप सिनेमे झालेत, असं आता इमरानलाही वाटायला लागलंय. त्यामुळेच, ‘मी भट्ट कॅम्पचे अनेक सिनेमे नाकारलेत कारण मला वाटतं की त्यामध्ये कोणताही ड्रामा किंवा इमोशनल कनेक्टिव्हिटी नव्हती... पण, जेव्हा कुणालनं मला ही कथा ऐकवली तेव्हा मला असं जाणवलं की या सिनेमात एक इमोशनल कथानक आहे’ असं इमराननं म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.