व्हिडिओ : प्रियांकाच्या पहिल्या अमेरिकन टीव्ही शो 'क्वांटिको'चा ट्रेलर

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोपडा हिचा पहिला अमेरिकन टीव्ही शो 'क्वांटिको' लोकांसमोर जाण्यासाठी सज्ज झालाय. या कार्यक्रमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. प्रियांकानं मंगळवारी सायंकाळी हाच ट्रेलर सोशल वेबसाईटद्वारे आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. यावेळी, आपण खूप नर्व्हस असल्याचंही प्रियांकानं म्हटलंय. 

Updated: May 13, 2015, 01:59 PM IST
व्हिडिओ : प्रियांकाच्या पहिल्या अमेरिकन टीव्ही शो 'क्वांटिको'चा ट्रेलर title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोपडा हिचा पहिला अमेरिकन टीव्ही शो 'क्वांटिको' लोकांसमोर जाण्यासाठी सज्ज झालाय. या कार्यक्रमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. प्रियांकानं मंगळवारी सायंकाळी हाच ट्रेलर सोशल वेबसाईटद्वारे आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय. यावेळी, आपण खूप नर्व्हस असल्याचंही प्रियांकानं म्हटलंय. 

'एबीसी'च्या कार्यक्रमात सहभाग घेणारी प्रियांका ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरलीय. माजी मिस वर्ल्ड प्रियांका 'क्वांटिको'मध्ये एका तरुण एफबीआय रंगरुट 'एलेक्स पॅरिश'च्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेत प्रियांकानं काही बोल्ड सीन्सही दिलेत. जॅक मॅकलोगलीन, डोग्रे स्कॉट आणि औनजानू एलिस हेदेखील या कार्यक्रमाचा भाग आहेत. 

'क्वांटिको' ही काही एफबीआयच्या तरुण सदस्यांच्या समूहाची कथा आहे. वर्जिनिया स्थित क्वांटिकोमध्ये प्रशिक्षणादरम्यान आपलं ध्येय गाठण्याचा प्रयत्न हे सगळे करत आहे. 'गॉसिप गर्ल'मध्ये काम करणाऱ्या जोश साफराननं याची कथा लिहिलीय. तर मार्क मुंडननं या कार्यक्रमाचं दिग्दर्शन केलंय. 

व्हिडिओ पाहा :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.