सलमानच्या घरात चाललंय तरी काय?

मुंबई : सलमान खानच्या घराला नजर लागून जणू काही घराचे वासे फिरलेत की काय अशी परिस्थिती सध्या आहे.

Updated: Jan 31, 2016, 11:17 AM IST
सलमानच्या घरात चाललंय तरी काय?

मुंबई : सलमान खानच्या घराला नजर लागून जणू काही घराचे वासे फिरलेत की काय अशी परिस्थिती सध्या आहे. कारण, प्रेम आणि जिव्हाळ्यासाठी प्रसिद्ध अशा या घरात आता घटस्फोटांची मालिका आता थांबायचं नाव घेत नाहीये.

सलमान जिला बहीण मानतो त्या श्वेता रोहीराचा गेल्या वर्षी तिचा पती असलेल्या पुलकित सम्राटसोबत घटसफोट झाला. श्वेता ही सलमानची मानलेली बहीण जरी असली तरी तिच्या लग्नात सलमाननेच तिचं कन्यादान केलं होतं.

तिच्या घटस्फोटाच्या धक्क्यातून त्यांच कुटुंब सावरतंय तोच आता मलायका आणि त्याचा भाऊ अरबाज खान वेगळे होत असल्याच्या चर्चा रंगतायत. त्यांचा १८ वर्षांच्या संसार मोडण्याच्या वाटेवर आहे. त्यांना अरहान नावाचा १४ वर्षांचा मुलगादेखील आहे. 

मात्र अद्याप ते कायदेशीररित्या वेगळे झालेले नसले तरी आता त्यांच्यात समेट घडण्याच्या शक्यता कमी आहे. बॉलीवूडमधील आदर्श जोडपं म्हणून अरबाज आणि मलायकाकडे पाहिले जायचे. मात्र आता इतक्या वर्षानंतर त्यांच्यात असे काय घडले ज्यामुळे घटस्फोट घेण्यापर्यंतची वेळ आलीये असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. सलमानच्या मागचं हे सत्र आता कधी थांबणार याचीच त्याचे चाहते वाट पाहात आहेत.