पाहा : शाहरूख, आमिर आणि सलमान चक्क एकत्र

 बॉलीवूडचे तीन खान एकाच वेळी एकाच ठिकाणी पाहण्याची इच्छा अनेकांची असेल,  पण हे आतापर्यंत झाले नाही.  पण मंगळवारी रात्री राजधानी दिल्लीत तिन्ही खान एकाच ठिकाणी दिसले. एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात बॉलीवूडचे तीन खान आमिर, शाहरूख आणि सलमान एकत्र दिसले. प्रगती मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात तिन्ही खानांनी अनेक गौप्यस्फोट केले.

Updated: Dec 3, 2014, 06:04 PM IST
पाहा :  शाहरूख, आमिर आणि सलमान चक्क एकत्र title=

नवी दिल्ली :  बॉलीवूडचे तीन खान एकाच वेळी एकाच ठिकाणी पाहण्याची इच्छा अनेकांची असेल,  पण हे आतापर्यंत झाले नाही.  पण मंगळवारी रात्री राजधानी दिल्लीत तिन्ही खान एकाच ठिकाणी दिसले. एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात बॉलीवूडचे तीन खान आमिर, शाहरूख आणि सलमान एकत्र दिसले. प्रगती मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात तिन्ही खानांनी अनेक गौप्यस्फोट केले.

या तिन्ही खानांची मैत्री आणि वैर हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्षांपासून चर्चाचा विषय बनला आहे. आमिर-शाहरूखमध्ये वाद दिसले तर आमीर-सलमानचा याराना चर्चेचा विषय बनला. यातील सर्वाधिक चर्चा शाहरूख-सलमानच्या फाइटबद्दल झाली होती. नुकतेच सलमानची बहिण अर्पिताच्या लग्नावेळी या दोन्ही सुपरस्टार्सबद्दल पॅचअप झाले होते. 

अर्पिताच्या लग्ना सोहळ्यांमध्ये तिन्ही खान उपस्थित होते पण एकत्र दिसले नव्हते. शाहरूख अर्पिताच्या मेहंदी वेळी सलमानच्या मुंबईतील घरात उपस्थित होता. तर आमिर लग्नावेळी हैदराबादला गेला होता. त्यामुळे तिन्ही खानांना एकत्र पाहण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती. रविवारी एका टीव्ही शो मध्ये तिन्ही खानांना मस्ती मजाक करताना दिसणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.