मुंबई : कोर्टानं सलमान खानला निर्दोष जाहीर केल्यानंतर लैंगिक अत्याचार प्रकरणात सध्या तुरुंगाची हवा खात असलेल्या आसारामच्याही आशा पल्लवीत झाल्यात.
देशातील न्यायपालिकेवर आपला पूर्ण विश्वास आहे... सलमानसोबत चांगलं झालं... आता माझ्यासोबतही चांगलच होईल... असं म्हणत आसारामनं आपल्या सुटकेच्या आशा बोलून दाखवल्यात.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली आसारामला अटक करण्यात आलीय. या प्रकरणाची सुनावणी सोमवारी पार पडली. या दरम्यान आसारामनं आपल्या सुटकेची आशा व्यक्त केलीय.