मुंबई : 'बिग बॉस सीझन - ९'मध्येदेखील या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्पर्धकांची धडपड पाहायला मिळतेय... पण, बिग बॉसच्या एका माजी स्पर्धकानं मात्र 'बिग बॉसमध्ये आल्यानंतर कामं मिळतात, ही चुकीची समजूत असल्याचा खुलासा केलाय.
'बिग बॉस सीझन ७'मध्ये दिसलेली रतन राजपूत हीनं हा धक्कादायक खुलासा केलाय. यासाठी तिनं आपलं स्वत:चंच उदाहरणदेखील दिलंय. 'बिगबॉस'सारख्या वादग्रस्त कार्यकमात सहभागी होण्यामागे, भविष्यात त्याचा फायदा होईल... कामं मिळतील... अशी समजूत असल्याचं रतनचं म्हणणं आहे.
रतननं अगले जनम मोहे बिटिया ही किजो, लाली आणि महाभारत अशा अनेक कार्यक्रमांत काम केलंय. बिग बॉस या कार्यक्रमाबद्दल तिचा अनुभव काय होता, असं जेव्हा तिला विचारण्यात आलं... तेव्हा 'बि ग बॉसच्या घरात राहण्याचा मला काहीच फायदा झाला नाही.... मी ज्या सिरीयलमध्ये सध्या काम करतेय, त्या सर्वांसाठी मला अॅडिशन आणि लूक टेस्ट द्यावी लागलीय. टीव्ही इंडट्रीमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला काही करायला लागतं ते सर्व मी केलंय, असंही रतन म्हणतेय. सध्या रतन 'संतोषी माँ' या कार्यक्रमात दिसतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.