मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान अर्थात अभिनेता सलमान खानच्या सदिच्छादूतच्या निवडीवरुन वाद सुरु आहे. या वादात सल्लूची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायने उडी घेतलेय.
ज्याप्रकारे सलमानच्या निवडीला विरोध होत आहे, त्याचवेळी बॉलिवूडमधून अनेकजण त्याच्या समर्थनासाठी पुढे येत आहे. सलमान खानची एक्स गर्लफ्रेण्ड ऐश्वर्या राय आता सलमानच्या समर्थनासाठी पुढे आली आहे.
रिओ ऑलिम्पिक सदिच्छादूतवरुन सुरु असलेल्या वादावर ऐश्वर्याला प्रश्न विचारल्यानंतर सलमानला ऐशने पाठिंबा दर्शविला आहे. या वादाबद्दल अजून स्वत: सलमान खानने कोणतीही प्रतिक्रिया दिेलेली नाही. मात्र बॉलिवूडमधून अनेकांनी त्याच्या या निवडीचं समर्थन केलं आहे.