महिला कंडोमला का देतात पसंती?

कंडोम म्हणजे सुरक्षितता असं नेहमीच म्हटंल जातं. मात्र फक्त सुरक्षितता नव्हे तर एक आवड म्हणूनही सेक्समध्ये कंडोमचा वापर होतो. अनेक महिलांना आपल्या पार्टनरने कंडोमचा वापर करावा अशी तीव्र इच्छा असते.

Updated: May 3, 2012, 02:45 PM IST

www.24taas.com

 

कंडोम म्हणजे सुरक्षितता असं नेहमीच म्हटंल  जातं. मात्र फक्त सुरक्षितता नव्हे तर एक आवड म्हणूनही सेक्समध्ये कंडोमचा वापर होतो. अनेक महिलांना आपल्या पार्टनरने कंडोमचा वापर करावा अशी तीव्र इच्छा असते. नुकतंच इग्लंडमध्ये झालेल्या एका सर्व्हेमध्ये ही गोष्ट पुढे आली आहे. कि महिला या जास्तीत जास्त कंडोमला पसंती देतात.

 

या सर्व्हेनुसार जे आकडे समोर आले आहेत ते असे की ५० वर्षापेक्षा कमी १४६४ पुरूष आणि १०९३ महिला यांच्यावर हा प्रयोग करण्यात आला आहे. त्यातील प्रत्येक चार पैकी तीन महिला ह्या कंडोमचा वापर करून सेक्स करण्याला पसंती देतात. तर फक्त २८ टक्के महिला या कंडोमचा वापर न करता सेक्ससाठी उत्सुक असतात.

 

कमी वयाच्या महिला या कंडोमला पसंती देतात कारण की ते सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे. त्यामुळे त्यांची जास्तीत जास्त पसंती ही कंडोमला असते. मात्र त्याच बरोबर अधिक वयाच्या महिलाही कंडोमला पसंती देतात. जवळजवळ  ९० टक्के महिला ह्या गर्भधारणा होऊ नये यासाठी कंडोमचा वापर करण्याबाबत आग्रही असतात. तर ४५ टक्के महिला ह्या गुप्त रोग आणि संक्रमण यापासून बचाव व्हावा यासाठी कंडोमला पसंती देतात.