मुंबई : एबीपी माझा आणि नेल्सनच्या सर्वेमध्येही भाजप हा प्रथम क्रमांकाचा पक्ष दाखविला असून शिवसेना दुसऱ्या, काँग्रेस तिसऱ्या, राष्ट्रवादी चौथ्या आणि मनसे पाचव्या क्रमांकाचा पक्ष असणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
भाजप क्रमांक एकचा पक्ष
या सर्वेत भाजपच्या वाटेला १२० जागा देण्यात आल्या आहेत. यापूर्वी ऑगस्टमध्ये केलेल्या सर्वेमध्ये १०७ जागा देण्यात आल्या होत्या. गेल्या निवडणुकीत भाजपला ४६ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये तब्बल ७४ जागांची वाढ दाखविण्यात आली आहे. त्यामुळे युती तुटल्याचे फायदा भाजपला झाल्याचे दाखविण्यात आले आहे.
शिवसेनेला युती तुटल्याचा तोटा
शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनेल, त्यांना ६७ जागा देण्यात आल्या आहेत. यापूर्वी ऑगस्टमध्ये केलेल्या सर्वेमध्ये ८६ जागा देण्यात आल्या होत्या. गेल्या निवडणुकीत शिवसेनेला ४४ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये तब्बल २३ जागांची वाढ दाखविण्यात आली आहे. पण ऑगस्टच्या तुलने १९ जागा कमी दाखविल्या आहेत. त्यामुळे युती तुटल्याचे नुकसान शिवसेनेला झाल्याचे दाखविण्यात आले आहे.
काँग्रेसला दणका
काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांना ४६ जागा देण्यात आल्या आहेत. यापूर्वी ऑगस्टमध्ये केलेल्या सर्वेमध्ये ४० जागा देण्यात आल्या होत्या. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला ८२ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये तब्बल ३६ जागांचे नुकसान दाखविण्यात आले आहे. पण ऑगस्टच्या तुलने ६ जागा वाढल्या आहेत.
राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर
राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकाचा पक्ष असणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांना ३६ जागा देण्यात आल्या आहेत. यापूर्वी ऑगस्टमध्ये केलेल्या सर्वेमध्ये २५ जागा देण्यात आल्या होत्या. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ६२ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये तब्बल २६ जागांचे नुकसान दाखविण्यात आले आहे. पण ऑगस्टच्या तुलने १० जागा वाढल्या आहेत.
मनसेचे इंजिन चालत नाही
मनसेचा करिष्मा चालणार नाही असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यांना ०८ जागा देण्यात आल्या आहेत. यापूर्वी ऑगस्टमध्ये केलेल्या सर्वेमध्ये १० जागा देण्यात आल्या होत्या. गेल्या निवडणुकीत मनसेला १३ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये तब्बल ५ जागांचे नुकसान दाखविण्यात आले आहे.
इतर पक्षांना संधी कमी
या सर्वेत अपक्षांना ११ जागा देण्यात आल्या आहेत. यापूर्वी ऑगस्टमध्ये केलेल्या सर्वेमध्ये १३ जागा देण्यात आल्या होत्या. गेल्या निवडणुकीत मनसेला ४१ जागा मिळाल्या होत्या. या जागांमध्ये तब्बल ३० जागांचे नुकसान दाखविण्यात आले आहे.
पक्ष |
जागा |
भाजप |
१२० |
शिवसेना |
६७ |
राष्ट्रवादी |
३६ |
काँग्रेस |
४६ |
मनसे |
०८ |
अपक्ष-इतर |
११ |
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.