मुंबई: ३१ तारखेच्या शपथविधी सोहळ्याला मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलंय. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: फोन करून उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवारांना आमंत्रण दिल्याची माहिती मिळतेय.
राज्यात भाजपचा पहिलाच मुख्यमंत्री होत असल्याने पक्षातर्फे मोठ्या जय्यत तयारी सुरु आहे. या सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी राजकारण्यांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींनाही निमंत्रण देण्यात आलं आहे.
निमंत्रितांच्या यादीत राज्यातील खेळाडूंचाही समावेश आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, महेंद्रसिंग धोनी, दिलीप वेंगसरकर, धनराज पिल्ले, अंजली भागवत, युवराज वाल्मिकी, पैलवान नरसिंह यादव, संदीप यादव, धावपटू आनंद मेनझेस यांचा समावेश आहे.
याशिवाय आशा भोसले, रतन टाटा, मुकेश अंबानी, अनिल अंबानी, सायरस मिस्त्री, सलमान खान, आमिर खान, हृतिक रोशन, सोनाक्षी सिन्हा यांना आमंत्रण देण्यात आलंय.
दरम्यान, शपथविधी सोहळ्यावर 'निलोफर' वादळामुळे ओढावलेलं पावसाचं सावटही आता दूर झालं आहे. त्यामुळं आता पावसाची चिंता दूर झाल्यानं भव्य शपथविधी सोहळयासाठी वानखेडे स्टेडियमवर वेगानं तयारी सुरु आहे.
तसंच संपूर्ण वानखेडे स्टेडियमवर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व चाचपण्या पोलिसांकडून करण्यात येत आहे. व्हीआयपींना बसण्यासाठी खास सोय करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.