आज पंतप्रधान मोदी मुंडेंच्या बीडमध्ये...

विधानसभा निवडणुकीचा प्रचाराला आता चांगलाच वेग येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस महाराष्ट्रात प्रचारासाठी येतायत. आज मोदींची बीडमध्ये सभा होतेय. 

Updated: Oct 4, 2014, 10:23 AM IST
आज पंतप्रधान मोदी मुंडेंच्या बीडमध्ये...  title=

बीड : विधानसभा निवडणुकीचा प्रचाराला आता चांगलाच वेग येतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस महाराष्ट्रात प्रचारासाठी येतायत. आज मोदींची बीडमध्ये सभा होतेय. 

भाजपच्या प्रचारसभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा बालेकिल्ला असणाऱ्या बीडमध्ये मुंडेंच्या निधनानंतर होत असलेली लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी मोदी बीडमध्ये येत आहेत. तब्बल दीड ते दोन लाख लोक बसतील अशा मोठ्या मैदानावर ही सभा होणार आहे. 
 
राज्यात पंतप्रधान मोदींचा प्रचारदौरा आजपासून सुरू होत असला तरी त्याआधीच महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना जळी - स्थळी - काष्ठी - पाषाणी मोदीच दिसतायत. मोदींच्या दौऱ्याआधीच निवडणूक मोदीमय झालेली दिसतेय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.