गडकरींच्या ‘लक्ष्मीला नाकारू नका’ वक्तव्यावरून निवडणूक आयोगाची नोटीस

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवडणूक आयोगानं नोटीस बजावलीय. त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका निवडणूक आयोगानं ठेवलाय. बुधवार संध्याकाळपर्यंत नोटीशीला उत्तर देण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं गडकरींना दिले आहेत. 

Updated: Oct 7, 2014, 07:31 AM IST
गडकरींच्या ‘लक्ष्मीला नाकारू नका’ वक्तव्यावरून निवडणूक आयोगाची नोटीस title=

नवी दिल्ली: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवडणूक आयोगानं नोटीस बजावलीय. त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका निवडणूक आयोगानं ठेवलाय. बुधवार संध्याकाळपर्यंत नोटीशीला उत्तर देण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं गडकरींना दिले आहेत. 

उत्तर न दिल्यास थेट कारवाईचा निर्णय घेणार असल्याचंही नोटीशीत बजावण्यात आलंय. लातूर जिल्ह्यातल्या निलंगाच्या सभेत बोलताना पैसे घेऊन मतदान करा, असं वादग्रस्त वक्तव्य नितीन गडकरींनी केलं होतं.  

या निवडणुकीत अनेक भ्रष्ट नेते उभे आहेत. या भ्रष्ट नेत्यांकडे असलेला पैसा ते खुल्या हातानं वाटत आहेत, ते पैसे घ्या, आलेल्या लक्ष्मीला नाकारू नका, पण मत मात्र भाजपलाच द्या! असं आवाहन नितीन गडकरींनी प्रचार सभेत केलं होतं.
 
गडकरींच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याने आदर्श आचार संहितेचा भंग झाला असल्याचं आयोगाला प्रथमदर्शनी वाटतं आणि त्याबाबत बाजू स्पष्ट करावी, असंही आयोगाने गडकरींना बजावलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.