एनडीएतून बाहेर पडण्याविषयी उद्धव ठाकरेंचा यूटर्न

अनंत गिते केंद्रीयमंत्रीपदाचा राजीनामा देणार अशी गर्जना केल्याच्या २४ तासांच्या आतच उद्धव ठाकरेंनी मंगळवारी यूटर्न घेतलाय. एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतून परतल्यावर त्यांच्याशी चर्चा करुन घेणार, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. 

Updated: Sep 30, 2014, 04:21 PM IST
एनडीएतून बाहेर पडण्याविषयी उद्धव ठाकरेंचा यूटर्न title=

मुंबई: अनंत गिते केंद्रीयमंत्रीपदाचा राजीनामा देणार अशी गर्जना केल्याच्या २४ तासांच्या आतच उद्धव ठाकरेंनी मंगळवारी यूटर्न घेतलाय. एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेतून परतल्यावर त्यांच्याशी चर्चा करुन घेणार, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. 

जागावाटपावरुन राज्यातील २५ वर्ष जुनी युती तुटली असली तरी शिवसेनेनं केंद्रातील एनडीए सरकारचा पाठिंबा अद्याप काढलेला नाही. यावरुन मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शिवसेनेवर निशाणा साधला होता. राज ठाकरेंच्या टीकेनंतर सोमवारी उद्धव ठाकरेंनी मोदी अमेरिकेतून परतल्यावर अनंत गिते राजीनामा देतील, असं सांगितलं होतं. 

आता मात्र त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याविषयी सावध भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी अमेरिका दौऱ्यातून परतल्यावर त्यांच्याशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेऊ. 

आरपीआय नेते अर्जुन डांगळे यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यावर मंगळवारी डांगळेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवसेनेच्या मदतीला अर्जुन धावून आला अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी डांगळेंचं स्वागत केलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.