जळगाव : अमळनेर तालुक्यात नंदगावात एका अपक्ष उमेदवाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.
पैसे वाटपाच्या संशयावरून ही तोडफोड करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
नंदगावात सोमवारी रात्री शिरीष चौधरी यांच्या कार्यकर्त्यांच्या तवेरा गाडीची तोडफोड करण्यात आली, तालुक्यात पैसे वाटपाच्या संशयावरून तणावाचं वातावरण आहे.
यात शिरीष चौधरी यांचे तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत, यात भावेश दीपक बागुल, राहणार नंदुरबार हे देखिल किरकोळ जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांच्यासह एसआरपी प्लॉटूनने नंदगावात दाखल झालं.
याबाबतीत रात्री उशीरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. दोन्ही गटांनी पोलिस स्टेशनला गर्दी केली होती.
अमळनेर मतदारसंघात यापूर्वीच ८० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.